आक्रम एफसीला बीएलएफसीने रोखले, चॅम्पियन चषक फुटबॉल स्पर्धा
प्रतिनिधी / बेळगाव
फुटबॉल लव्हर्स स्पोर्ट्स क्लब आयोजित चॅम्पियन चषक फुटबॉल स्पर्धेत दुसऱया दिवशी खेळविण्यात आलेल्या सामन्यात साईराज यूएफसीने सीएससीचा 3-0, डीयूएफसीने युनायटेड सीएफसी अजितचा 2-0 तर युनायटेड ब्रदर्सने बीटा संघाचा 1-0 असा पराभव केला. बीएलएफसी- आक्रम एफसी सामना बरोबरीत राहिला.
टिळकवाडीतील लेले मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात साईराज एफसीने सीएससी संघाचा 3-0 असा पराभव केला. या सामन्यात 36 व्या मिनिटाला निखील जाधवने पहिला गोल केला. 39 व्या मिनिटाला मंथनने दुसरा तर 70 व्या मिनिटाला व्हेंडिलने तिसरा गोल
केला. दुसऱया सामन्यात बीएलएफसीने आक्रम एफसीला 1-1 असे बरोबरीत रोखले. या सामन्यात 33 व्या मिनिटाला ऍस्टीनने बीएलएफसीला आघाडी मिळवून दिली तर दुसऱया सत्रात 43 व्या मिनिटाला आक्रमच्या मिथिलने बरोबरीचा गोल केला. तिसऱया सामन्यात डीयूएफसीने सीएफसी अजित संघाचा 2-0 असा पराभव केला. या सामन्यात जोतिबा पाटीलने 66 व्या मिनिटाला पहिला गोल तर विश्वनाथ पाटीलने 70 व्या मिनिटाला दुसरा गोल केला. चौथ्या सामन्यात युनायटेड ब्रदर्स संघाने बीटा स्पोर्ट्स क्लबवर 1-0 असा निसटता विजय मिळविला. या सामन्यात सातव्या मिनिटाला जेएसएसने एकमेव विजयी गोल नोंदवला.