प्रतिनिधी/ बेळगाव
कॅन्टोन्मेंट बोर्डचे सदस्य साजिद शेख यांनी नागरिकांची सोय व्हावी, यासाठी आपल्या आई-वडिलांच्या स्मरणार्थ एक शववाहिका कॅन्टोन्मेंट बोर्डला देणगी स्वरुपात दिली. या शववाहिकेचा लोकार्पण सोहळा शनिवारी पार पडला. कॅन्टोन्मेंट बोर्डचे अध्यक्ष ब्रिगेडिअर रोहित चौधरी व सीईओ बर्चस्वा यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
शववाहिकेचे लोकार्पण करून ब्रिगेडिअर रोहित यांनी साजिद शेख यांचे कौतुक केले. साजिद शेख म्हणाले, कोरोनाच्या काळात अनेकांना शववाहिका मिळत नव्हत्या, यामुळे नागरिकांचे अतोनात हाल झाले. ही बाब लक्षात घेऊन ही शववाहिका कॅन्टोन्मेंटकडे देणगी स्वरुपात देण्यात आली आहे. सर्व जाती-धर्माच्या लोकांसाठी ही शववाहिका उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी गौस शेख, युसूफ शेख, गुलाब शेख, अल्ताफ शेख, डॉ. राहिला शेख, डॉ. समीर शेख, इब्राहिम शेख, साबीर शेख, कॅन्टोन्मेंट उपाध्यक्षा निरंजना अष्टेकर, सदस्य विक्रम पुरोहित, रिझवान बेपारी, अरेबिया धारवाडकर, अलेद्दीन किल्लेदार, डॉ. मदन डोंगरे यांच्यासह इतर उपस्थित होते.