वाठार किरोली / प्रतिनिधी :
नामदार बाळासाहेब पाटील सहकार व पणन मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री सातारा जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत वाठार किरोलीच्या १४ व्या वित्त आयोगातून झालेल्या विकासकामांचा उद्घाटन समारंभ शुक्रवार दि.२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता कराड उत्तरचे आमदार नामदार बाळासाहेब पाटील सहकार व पणन मंत्री यांच्या शुभहस्ते आयोजित करण्यात आला आहे.
यावेळी वाठार किरोली ता. कोरेगाव येथे १४ व्या वित्त आयोगातून झालेल्या डिजीटल ग्रामपंचायत L.E.D स्क्रीन बोर्डाचे तसेच सी.सी. टी. व्ही कॅमेरा, बायोमेट्रिक सिस्टीम, लॅपटॉप या सुमारे ३ लाख ७० हजार आणि हायमॉस पोल लाईट २ लाख २५ हजार , अंगणवाडी सुधारणामध्ये आठ अंगणवाडी केंद्रात लहान मुलांना खेळणी व पोषण आहार १ लाख ५० हजार, आठ अंगणवाडी केंद्रात कारपेट मॅट बसविले ९७ हजार ८१४ अशा विविध विकासकामांचे उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा मान्यवरांचे हस्ते करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमासाठी कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती काकासाहेब गायकवाड, माजी पंचायत समिती सदस्य पांडुरंग बुवा गायकवाड, सरपंच सविता गुजले, उपसरपंच पोपट गायकवाड, चेअरमन मोहन खिलारे, व्हाईस चेअरमन कृष्णत गायकवाड, जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पांडुरंग दादा गायकवाड, जोतिर्लिंग जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष तुकाराम खामकर यांची प्रमुख उपस्थिती आहे. या कार्यक्रमासाठी सर्व ग्रामपंचायत सदस्य, तसेच विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे सर्व संचालक, आणि ग्रामस्थांनी उपस्थित रहावे, असे आवाहन सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस संभाजीराव गायकवाड , सरपंच सविता गुजले, उपसरपंच पोपटराव गायकवाड यांनी केले आहे.