खटाव तालुक्याचा शिरपेचात मानाचा तुरा
औंध / प्रतिनिधी:
भारत सरकारच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बायोएनर्जी ,कपूरतला( जालंधर) येथे औंध ता.खटाव येथील डॉक्टर आशिष हणमंत पवार यांची सहाय्यक शास्त्रज्ञ म्हणून निवड झाली आहे.
डॉ.पवार हे मुळचे औंध (ता.खटाव) येथील सुपूत्र आहेत. श्रीहनुमान विद्यालय भोसरेचे मुख्याध्यापक एच एल पवार सर यांचे चिरंजीव आहेत. डॉ आशिष यांचे प्राथमिक शिक्षण खटाव येथील प्राथमिक शाळेत पार पडले.
तसेच माध्यमिक शिक्षण येथील श्रीलक्ष्मी नारायण इंग्लिश स्कूल मध्ये झाले. महाविद्यालयीन शिक्षण शहाजीराजे महाविद्यालय खटाव येथे झाले. वडिलांच्या नोकरीमुळे व शिक्षणामुळे त्यांची नाळ खटावशी जोडली गेली.
त्यांचे पुढील शिक्षण बी. टेक ऍग्री इंजिनीअरींग कोकण कृषी विद्यापीठातनू तर एम. टेक व पी एच डी महाराणा प्रताप विश्वविद्यालय उदयपूर राज्यस्थान येथनू पूर्ण केले.त्यांना पी एच डी संशोधनासाठी सी .एस .आय .आर तर्फे फेलोशीप देखील मिळाली होती. या व्यतरिक्त त्यांना दोन उपकरणांचे पेटेंट सुद्धा मिळाले आहे. मुळातच कुटुंबात शैक्षणिक वारसा असल्याने घरातील वातावरण पोषक असेच लाभले. कुटुंबातील सर्वांचे सहकार्य मिळाल्याने माझ्या यशात कुटुंबाचा व ज्या मातीत मी लहानाचा मोठा झालो त्या खटाव नगरीचा मोलाचा वाटा आहे अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.
त्यांच्या या उत्तुंग यशाबद्धल चद्रंहार पाटील ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अजित पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य सजंय पाटील, संस्थेचे पदाधिकारी सर्व विद्याशाखांचे मुख्याध्यापक ,शिक्षक, कर्मचारी, श्री हनुमान देवस्थान ट्रस्ट व समस्त ग्रामस्थ भोसरे , औध, खटाव येथील अभिनदंन केले व पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या.
आई वडील गुरुंचे मार्गदर्शन मोलाचे ठरले
लहानपणापासून आई वडीलांचे पाठबळ आणि प्रोत्साहन मिळाले. गुरुंच्या मार्गदर्शनामुळे यशाची वाट सापडली. कुटुंबातील सर्वांचे सहकार्य मिळाल्याने माझ्या यशात कुटुंबाचा आणि ज्या मातीत वाढलो घडलो त्या खटाव नगरीचा मोलाचा वाटा आहे. डॉ. आशिष पवार