सातारा / प्रतिनिधी :
जिल्ह्यात आज 652 ग्रामपंचायतींसाठी 2 हजार 38 मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया सुरू आहे. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सकाळी मतदान केंद्रावर गर्दी होती तर दुपारी शुकशुकाट होता. संंवेदनशील मतदान केंद्रांना पोलीस अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या.
शशिकांत शिंदे यांनी कोडोली केंद्राबाहेर कार्यकर्त्यांची भेट घेतली तर आमदार महेश शिंदे यांनी ही मतदान केंद्रांवरील परिस्थितीची माहिती घेतली.