प्रतिनिधी/नागठाणे
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करून गणपती विसर्जनावेळी वाजत गाजत मिरवणूक काढल्याप्रकरणी बोरगाव पोलिसांनी कारवाई करून सतरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन यादवराव पवार, धनराज श्रीरंग पवार, श्रीधर भरत पवार, विनोद श्रीरंग पवार, प्रमोद मोहन पवार, राहुल सूर्यकांत पवार, धीरज शशिकांत पवार, दादासो रामचंद्र पवार, प्रथमेश भरत पवार, अरुण सर्जेराव पवार, शशिकांत मुगुटराव पवार, वैभव चंद्रकांत पवार, विक्रम बाळासो गायकवाड, सोमनाथ जयप्रकाश सावंत, अनिल जोतिराम पवार, अमोल हणमंत पवार, राज दत्ता पवार (सर्व रा.टिटवेवाडी ता.सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहे. यावेळी दहा ते पंधरा जण पोलिसांना पाहून पळून गेले असल्याचे समजते.
याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार टिटवेवाडी ( ता.सातारा) येथील जय हनुमान तरुण गणेश मंडळाने देशमुखनगर ते फत्यापुर मार्गावर एका ट्रॅक्टर बरोबर असणाऱ्या चारचाकी ट्रॉली मधून श्री गणेशाचे मूर्ती विसर्जनासाठी साउंड सिस्टीम सहित मिरवणूक काढली असल्याची माहिती सपोनि डॉ.सागर वाघ यांना मिळाली होती. त्या पार्श्वभूमीवर सपोनि सागर वाघ यांनी कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर पोलीस कर्मचारी यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहिले असता गणेशाची मूर्ती ट्रॉलीमधून नेत असताना साऊंड सिस्टीम वर तीस ते पस्तीस जण विनामास्क नाचत असल्याचे आढळून आले.
यामध्ये जिल्हाधिकारी यांचे कोरोना अनुशंगाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन झाले असल्याने त्यांचेवर कारवाई केली. घटनास्थळावरून पोलिसांनी एक ट्रॅक्टर, चारचाकी ट्रेलर तसेच अहुजा कंपनीची एक मशीन, दोन बेस असे साहित्य जप्त केले आहे. सदरची कारवाई सहाय्यक फौजदार भीमराव यादव, पो.कॉ.मनोहर सुर्वे, विजय साळुंखे, विशाल जाधव, किरण निकम यांनी केली. घटनेची नोंद बोरगाव पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास सहाय्यक फौजदार भीमराव यादव करत आहेत.