उपनगराध्यक्ष किशोर शिंदे यांनी केली पाहणी
रात्री घडल्याने जीवित हानी नाही, अग्निशमन विभागाने लगेच पडलेला भाग हटवला
प्रतिनिधी / सातारा
सातारा पालिकेची राजवाडा येथील जुनी इमारत आहे. त्या इमारतीचा जीर्ण झालेला भाग रात्री 9.30च्या दरम्यान कोसळला. सुदैवाने कोणतीही जीवित वा वित्त हानी झाली नाही. अग्निशमन विभागास कळताच लगेच तेथे पोहचुन पडलेला भाग लगेच तेथून काढण्यात आला.उपनगराध्यक्ष किशोर शिंदे यांनी या भागाची केली पाहणी आहे. रात्री गॅलरीचा भाग कोसळल्याने काही घटना घडली नाही.
सातारा पालिकेच्या जुन्या इमारतीमध्ये जेथून प्रवेश करतो त्याच्या वरच्या भागात धोकादायक अशी परिस्थिती बनली आहे. या इमारतीत जुगारी आपला डाव मांडत असतात. तसेच तलाठी कार्यालय आणि आरोग्य विभागाचे गोदाम आहे. प्रवेशद्वार असलेल्या ठिकाणची गॅलरी जीर्ण झाली आहे. काल रात्री 9.30वाजण्याच्या सुमारास ही गॅलरीचा काही भाग कोसळला. तत्काळ अग्निशमन विभाग पोहचला. उपनगराध्यक्ष किशोर शिंदे हेही तेथे पोहचले. त्यांनी याची पाहणी केली. कोणतीही जीवित हानी झाली नाही.