सातारा / प्रतिनिधी :
सातारा पालिकेने काही वर्षापूर्वी आयडीया कंपनीचे पोस्टपेड कार्ड पालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना दिले होते. त्याच कार्डचा वापर सर्व अधिकारी आणि कर्मचारी करतात. मात्र, गत एक महिन्यापूर्वी एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याने आपला नंबर पालिकेला परत न करता मोबाईलचा जादा वापर केला. त्याचे बील थकले अन् सर्वांचे मोबाईल आयडीया या कंपनीने बंद ठेवले आहेत. त्यामुळे पालिकेतील अनेकांनी आपल्या बँक खात्याला तो नंबर दिला गेल्याने आता गैरसोय होत आहे.
सातारा पालिकेने कर्मचारी, अधिकाऱ्यांन ऑफिशियल कामाकरिता आयडिया कंपनीची पोस्टपेड कार्ड दिली होती. त्यानुसार वरीष्ठ अधिकाऱ्यांपासून काही मोजक्या कर्मचाऱ्यांच्या मोबाईलमध्येही ही सेवा दिसत होती. 91122134.. ही सिरियल पालिकेच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांकडे आहे. मात्र, पालिकेच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांकडून त्या फोनाचा वापर होत होता. परंतु, काही अधिकारी हे हा फोन नेमका दुपारी दीड ते साडेतीन या वेळेत बंद, आणि सुट्टीच्या दिवशी बंद ठेवतात. सायंकाळीही ऑफिस झाल्यानंतर तो फोन बंद मोडमध्ये टाकतात.
एका अधिकाऱ्याने तर सेवानिवृत्त झाल्यानंतरही त्या फोनचा अनावश्यक वापर केला. अन् बील पाच ते सहा हजाराच्या दरम्यान आले. त्यांच्याप्रमाणे काही कर्मचाऱ्यांनीही असाच फोनचा वापर केला. त्यामुळे पालिकेकडे बील आले अव्वाच्या सव्वा. गेल्या एक महिन्यापासून आयडीयाने सेवाच खंडीत केली. आता काही कर्मचाऱ्यांनी तो नंबर बँकखात्याला सलग्न केला आहे. तो नंबर बंद झाल्याने बँकेतले व्यवहारही ठप्प झाले असल्याने काहींनी नंबर बदलण्याची विनंती बँकेकडे केली आहे. तर पालिकेने मोजकेच मोबाईल सुरु ठेवण्याकरता खटपट सुरु केली आहे.