प्रतिनिधी / सातारा
सातारा शहर शिवसेनेच्यावतीने ६ नोव्हेंबर रोजी मा. सहाय्यक उपआयुक्त अन्न आणि औषध प्रशासन, सातारा यांना शहरातील भेसळयुक्त मिठाई, बेकरी उत्पादित मालात होणारी भेसळीबाबतची तपासणी (साखर, रवा, मैदा, खवा) या खाद्यपदार्थांची व त्यांच्या लायसेन्सची तपासणी करणे, कोविड १९ मध्ये थुंकण्यास बंदी असताना महाराष्ट्र शासनाची गुटखा बंदी असताना शहरामधील टपरीमालक, दुकानदार यांच्याकडे राजरोसपणे गुटख्याची विक्री चालू आहे यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी, मंडईमध्ये कडधान्याला (वाटाणा) कलर लावून विक्री चालू आहे तसेच बाहेरून येणाऱ्या सुट्या दुधामधील भेसळीची तपासणी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. या सर्व विषयांबाबत निमिश शहा शहर प्रमुख शिवसेना सातारा यांचे नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. यावेळी शहरातून विकत आणलेल्या गुटख्याच्या पुड्या त्या अधिकाऱ्यांच्या हातात भेट म्हणून देण्यात आल्या.
सातारा येथील मा सहाय्यक उपायुक्त कार्यालयास गेले अनेक महिने झाले पूर्ण वेळ अधिकारी उपलब्ध नाही जिल्ह्याचा कारभार पुणेतील दिलीप संगत सो असिस्टंट कमीशनर यांच्याकडे तात्पुरते प्रभारी आहे. त्यामुळे सातारा कार्यालयात म्हणावे तितके लक्ष नाही. सध्या कोविड १९ लॉकडाउनमध्ये सरकारकडून शिथीलता देण्यात येवून व्यवहार काही प्रमाणात चालू झालेले आहेत. कोविड १९मध्ये थुंकण्यास मनाई आहे. अशातच गुटखा विक्री शहरामध्ये राजरोसपणे चालू आहे. बेकरीचे उत्पादन, मिठाईचे उत्पादन यामधील खवा, रवा, मैदा, साखरेचे प्रमाण, मिठाईची उत्पादन तारीखेची तपासणी करून नमुणे घेऊन दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
शहरात येणारे सुट्या दुधामधील भेसळीची तपासणी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, भाजी मंड़ईमध्ये कडधान्याला( वाटाणा) कलर लावून विक्री चालू आहे याचीपण तपासणी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी या सर्व मागण्याचे निवेदन देऊन येत्या सात दिवसांत यामधील अढळणा-या दोषींवर कड़क कारवाई करावी अन्यथा सातारा शहर शिवसेने तर्फे आपल्या कार्यालयासमोर शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन करण्यात येईल पुढील होणा-या त्रासास आपले कार्यालय जबाबदार राहील याची नोंद घ्यावी.
निवेदन देताना सयाजी शिंदे उपशहर प्रमुख, नितीन लकेरी विभाग प्रमुख, अॅड. उमेश लकेरी, मनोज बोंडे, शाखा प्रमुख प्रदीप दप्तरदार शाखा प्रमुख, मिनल शहा महिला संघटिका, जितेंद्र वाघंबरे विभाग, सचिन गायकवाड, संग्राम कांबळे विभाग प्रमुख, कांचन डांगरे शाखा प्रमुख, गणेश कुडवे, मोहित शहा, रजत नाईक, सुनील भालेराव, प्रकाश आवडे, इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते.