प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण व नागरी क्षेत्रात शुक्रवारी 159 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. उपचारादरम्यान सात रुग्णांचा मृत्यू झाला. तर उपचार घेऊन बरे झाल्याने 101 रुग्णांना घरी सोडले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव यांनी शुक्रवारी दिली.
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण व नागरी क्षेत्रात शुक्रवारी 3344 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 159 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह तर 3185 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 159 पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये 84 पुरुष आणि 75 स्त्रियांचा समावेश आहे. जिल्ह्यातील ग्रामीण व नागरी क्षेत्रात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 31950 झाली आहे.
-एकूण तपासणी केलेल्या व्यक्ती : 260439
-ग्रामीण भागातील पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती : 31950
-प्राप्त तपासणी अहवाल : 260402
-प्रलंबित तपासणी अहवाल : 37
-निगेटिव्ह अहवाल : 228452
-आजपर्यंत एकूण मृतांची संख्या : 948
-रुग्णालयात दाखल असलेल्या बांधितांची संख्या : 1824
-रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेले बाधितांची संख्या : 29179
तालुका निहाय पॉझीटिव्ह रुग्ण
-अक्कलकोट 1146, बार्शी 5814, करमाळा 2050, माढा 3308, माळशिरस 5548, मंगळवेढा 1442, मोहोळ 1591, उत्तर सोलापूर 739, पंढरपूर 6380, सांगोला 2489, दक्षिण सोलापूर 1444 आणि एकुण 31950