प्रतिनिधी / सातारा
महाआघाडी सरकारच्या काळात राज्यात महिलांवरील, तरूणींवरील, बालिकांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. अत्याचाराच्या घटनांना पायबंद घालण्यास राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. याच्या निषेधार्थ संपूर्ण राज्यभर भारतीय जनता पार्टीतर्फे निदर्शने करण्यात आली. हे आंदोलन भाजपच्या महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष डॉ. सुरभी भोसले यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
या आंदोलनात महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सुवर्णा पाटील, महिला मोर्चा सातारा शहराध्यक्ष रीना भणंगे, महिला मोर्चा सातारा ग्रामीणचे अध्यक्ष मोनाली पवार, नगरसेविका आशाताई पंडित, जिल्हा कार्यकारणी सदस्य सुनिशा शहा, सातारा शहर उपाध्यक्ष मनीषाताई पांडे, महिला मोर्चा शहर उपाध्यक्ष वैष्णवी कदम, सातारा शहर चिटणीस नजमा बागवान, युवती मोर्चा तालुका अध्यक्ष पल्लवी गायकवाड, सारिका मदने, कोमल अनपट, पुनम बाबर, शमीन शेख, पूनम पवार, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बालशेटवार, सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी, सातारा ग्रामीणचे अध्यक्ष राजेंद्र इंगळे, जिल्हा उपाध्यक्ष ॲड. प्रशांत खामकर, राहुल शिवनामे, सतीश भोसले, जिल्हा चिटणीस सुनील जाधव, सभापती मिलिंद काकडे, नगरसेवक धनंजय जांभळे, पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख ओबीसी मोर्चा नंदकुमार यादव, शहर सरचिटणीस जयदीप ठुसे, विक्रांत भोसले आदी उपस्थित होते.