श्री. शिववंदनेश्वर प्रतिष्ठानने राबवली मोहिम
प्रतिनिधी / सातारा
किल्ले वंदनगडावर रविवारी दिवसभर श्री. शिववंदनेश्र्वर प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी महादरवाजा परिसरात संवर्धन मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत पिंपोडे, शिवथर, जांबचे मावळे सहभागी झाले होते. त्यांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे. वंदनगड संवर्धन करण्यासाठी श्री. शिववंदनेश्वर प्रतिष्ठान सतत कार्य करत आहे.
वाई तालुक्यातील वंदनगडावर संवर्धन मोहिम वारंवार राबवण्यात येत आहे. लॉकडाऊनच्या काळात मोहिम थांबल्या आहेत. नाहीतर आठवड्यातून एकदा गडावर परिसरातील गावातील युवक श्रमदान करतात. त्यामुळे गडाच्या प्रति गावागावातल्या युवकांच्या मनात एक वेगळा भाव निर्माण होतो. रविवारी शिवथर, पिंपोडे आणि जांब या तीन गावातील युवकांनी संवर्धन मोहीम राबवली.