एक लाखाचा मुद्देमाल हस्तगत
वाई : वाई पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या एक लाख रूपये किमतीच्या मद्देमाल चोरी प्रकरणाचा छाडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. या गुन्ह्यातील संशयित अल्पवयीन बालक असून, त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून गुन्ह्यातील मद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी दि.23 नोव्हेंबर रोजी त्यांचे वडील चंद्रकांत साळुंखे यांनी त्यांचे मालकीचा आयशर टेम्पो क्र. एमएच/11/सीएच/4390 मध्ये कोईमतूर येथील ए.टी.ओ.(आय 1) लि.मधून भारत पेट्रोलियम माहूल, मुंबई या कंपनीचे वॉल्व्ह असलेले बॉक्स गाडीत भरले व ते माहूल, मुंबई येथे पोेहोच करणे करीता दि.27 नोव्हेंबर रोजी पासून सलग तीन दिवस कंपनीला सुट्टया असल्याने त्यांनी गाडी गंगापूरी, वाई येथे त्यांचे घराचे जवळ असलेल्या यात्रा मैदानात उभा केली होती. दि.27 नोव्हेंबर ते दिनांक 30 नोव्हेंबर रोजी पर्यन्त गाडी यात्रा मैदानातच उभा होती.
दि.30 नोव्हेंबर रोजी सकाळी 10.30 वा.च्या सुमारास फिर्यादी जाणे करीता गाडी जवळ गेले असता त्यांना गाडीची ताडपत्री उचकटलेली व रस्सी 1,00,000/- रु.किंमतीचे डीझेल पेट्रोल टॅक्टला लावण्याकरीता वापरण्यात येणारे दोन वॉल्व्ह चोरीस गेल्याची खात्री झाली. त्यानंतर त्यांनी वाई पो.स्टे.ला तक्रार दिली. तपासादरम्यान एका अल्पवयीन बालकाने गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यांच्याकडून चोरीस गेलेले 1,00,000/-रु.किं.चे दोन व्हॉल्व्ह जप्त करण्यात आले आहेत.