ऑनलाईन टीम / सातारा :
कोरेगाव तालुक्यातील वाठार स्टेशन परिसरात आज दुपारी तीनच्या सुमारास गारांचा तुफान पाऊस झाला. या गारपीटीमुळे रस्ते आणि शेती चक्क बर्फाच्छादीत झालेली होती. अर्धा तास झालेल्या या गारपीटीमुळे चक्क काश्मीरमध्ये आल्याचा भास वाठार स्टेशन परिसरात होत होता. रस्त्यावर गारांचा खचचं खच पहायला मिळत होता.
शेतातील साऱ्यांमध्ये गारांचा एक ते दीड फुटांचा थर साचला असून, शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.