50 हजाराचा दंड वसूल
प्रतिनिधी / कुडाळ
सध्या सातारा जिल्ह्यामध्ये कोरोना महामारीने थैमान घातले असून सातारा जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधितांच्या आकडा वीस हजाराच्या पार गेला असून अजूनही लोकांना कोरोनाची भीती व गांभीर्य नसल्यामुळे काहीजण विनामास्क व सोशल डिस्टंसिंग न पाळत नाहीत अशा लोकांवर सातारा जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्विनी सातपुते व dysp अजित टिके यांच्या मार्गदर्शनाखाली भुईज पोलीस स्टेशनचे स.पो.नि शाम बुवा व सहकाऱ्यांनि अचानकपणे मोहीम राबवून जनतेमध्ये मास्कबाबत जनजागृती करणे तसेच ज्यांनी सोशल डिस्टंसिंगचे पालन न करणाऱ्यांवर भुईज पोलीस स्टेशन हद्दीमध्ये भुईंज, पाचवड, आनेवाडी, टोल नाका, जोशिविहिर, वेळे, या परिसरात 101 लोकांच्या विरोधात कारवाई करत प्रत्येकी 500 प्रमाणे एकूण 50 हजार 500 रुपयांचा दंड वसूल केला असून सोशल डिस्टंसिंगचे पालन न करणारे पोलीस स्टेशन हद्दीतील 23 हॉटेल मालक व किराणा दुकानदार यांच्यावर कारवाईचा धनका देण्यात आला असून दोन इसमाच्या विरोधात 148 कलमानुसार गुन्हा ही दाखल दाखल झाला आहे.
या कारवाईमुळे भुइंज परिसरामध्ये आता चांगलंच विनामास्क व सोशल डिस्टंसिंग न पाळणाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाल असून लोकांपर्यंत मेसेज गेला आहे की जर विना मास्क रस्त्यावर फिराल तर थेट पोलिसांच्या कारवाईला सामोरे जाण्याची वेळ येणार आहे. त्यामुळे आता शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे खूप गरजेचे आहे. जो नियमांचे उल्लंघन करेल त्याच्यावर आता थेट पोलिस कारवाई करतील. यामुळे आता या कारवाईमुळे नक्कीच कोरोणाला रोखण्यास मदत होईल अशी चर्चा सर्वसामान्य जनतेमधून उमटू लागली आहे.
या कारवाईत भुईज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्याम बुवा, उपनिरीक्षक रत्नदीप भंडारे, पोलीस हवलदार घाडगे, तोरडमल, धायगुडे, मुंगसे, पवार, भोसले, कदम, आवळे, पवार नलवडे, कोळपे, गायकवाड ,कांबळे, यांनी या कारवाईमध्ये आपला सहभाग नोंदवला.