●रात्रभर पोलिसांची सुरू होती कारवाई
●14 जणांना वाई पोलिसांच्या ताब्यात
●पाच आलिशान गाड्या हस्तगत
प्रतिनिधी/सातारा
वाई तालुक्यातील वेरुळी या गावातील हायप्रोफाईल जुगार अड्यावर एलसीबीच्या पथकाने काल, रविवारी रात्री छापा टाकला. यावेळी पोलिसांनी या जुगार अड्यावरील14 जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून 86 लाख 25हजार 280 रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे. याबाबत वाई पोलिस अधिक तपास करीत आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,पोलीस अधीक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धिरज पाटील यांनी दिलेल्या सूचना नुसार व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक आनंदसिंग साबळे त्यांचे पथकास सातारा जिल्ह्यामध्ये अवैध तीन पानी जुगार खेळणाऱ्या अड्डयावर कारवाई करणे बाबत सुचना दिलेल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरिक्षक सर्जेराव पाटील यांना खास बातमी दारामार्फत माहिती मिळाली की,वेरुळी (ता.वाई जि.सातारा) गावचे हद्दीत कुकुरांजाणा नावचे शिवारात राजेश जनार्धन श्रीगिरी यांचे मालकीचे बंगल्यामध्ये अवैध तीन पानी पैशावर पैज लावुन जुगार खेळत आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी कारवाई करण्याच्या सुचना पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी दिल्या.
त्यानुसार सहाय्यक पोलीस निरिक्षक आनंदसिंग साबळे व त्यांच्या पथकाने वेरुळी येथील कुकुरांजाणा नावचे शिवारात राजेश जनार्धन श्रीगिरी यांच्या बंगल्यामध्ये छापा टाकुन एकूण १४ जणांना ताब्यात घेतले. त्यांचे कडून ८६ लाख,२५हजार२८०रु. चा मुद्देमाल जप्त केला. चौदा जण हे उच्चभ्रु असुन ते सर्वजण पुणे व सातारा येथुन त्यांच्या चार चाकी पाच अलिशान गाड्यामधुन केवळ जुगार खेळण्यासाठी आले असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांचेकडुन गाड्या जप्त करणेत आल्या आहेत. त्यांना पुढील कारवाईसाठी वाई पोलीस ठाणेच्या ताब्यात दिले आहे.
या कारवाईमध्ये पोलीस अधीक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धिरज पाटील यांनी दिलेल्या सूचना नुसार व स्थानिक गुन्हे शाखा सातारा वरीष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटीलयांचे मार्गदर्शनाखाली आनंदसिंग साबळे, पोहवा आनंदराव भोईटे, सुधीर बनकर, मुबीन मुलाणी, पोलीस नाईक शरद बेबले, नितीन गोगावले, प्रविण फडतरे, मुनीर मुल्ला, प्रमोद सावंत, निलेश काटकर, गणेश कापरे, पोलीस कॉन्स्टेबल विक्रम पिसाळ, विशाल पवार, वैभव सावंत व चालक संजय जाधव व पंकज बेसके, महिला पोलीस मोना निकम, विद्याताई पवार, नुतन बोडरे यांनी कारवाईत सहभाग घेतला.