बनावट चावीच्या साहाय्याने ऐवज लांबवला,
प्रतिनिधी/ सातारा
सोमवार पेठेत चोरटय़ाने बनावट चावीच्या सहाय्याने कपाट उघडून कपाटातील 5 लाख 78 हजार रुपयांचे दागिने चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली असून याची नोंद शाहुपूरी पोलीस ठाण्यात झाली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ज्योती जयकुमार पाटणकर (वय 48, रा. सोमवार पेठ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या घरातील कपाटातुन अज्ञात चोरटय़ाने दि. 20 फेब्रुवारी 2021 ते दि. 30 मे 2021 या दरम्यान 5 लाख 78 हजार रुपयांचे दागिने चोरुन नेले. यामध्ये 2 लाख रुपयांचे 5 तोळयाचे ब्रेसलेट, 80 हजार रुपयांची दोन तोळय़ाची साखळी, 80 हजार रुपयांची दोन तोळय़ाची अंगठी, 12 हजार रुपयांची तीन ग्रॅमची सोन्याची मूर्ती, 1 लाख 20 हजार रुपयांच्या सोन्याच्या बांगडय़ा, 20 हजार रुपयांचे पाच ग्रॅमचे सोन्यांचे गंठण, 38 हजार रुपयांचे 9.5 ग्रॅमचे दोन सोन्याचे पेंडट, 12 हजार रुपयांचे तीन ग्रॅम वजनाचे दोन सोन्याच्या साखळय़ा, 4 हजार रुपयांच्या एक ग्रॅमचा पॅन्डल, 12 हजार रुपयांची सोन्याची अंगठी, असा एकूण 5 लाख 78 हजार रुपयांचा ऐवज चोरटय़ाने बेडरुममधील गोदरेजच्या कपाटा डुब्लीकेट चावीने उघडून कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेला किमती माल चोरुन नेला आहे. पोलीस हवालदार दबडे हे तपास करत आहेत.