सातारा / प्रतिनिधी :
शहरातील मल्हारपेठ परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर सातारा शहर पोलिसांनी छापा टाकून 2 हजार रोख व जुगाराच्या साहित्यासह आठजणांना ताब्यात घेतले.
सचिन वसंत खंदारे, सुरज चंद्रकांत शिंदे , सुरज अशोक वायदंडे, महेश शिवकुमार दरवेशी, अशोक शंकर कदम (सर्व रा. मल्हारपेठ,सातारा), अमोल लक्ष्मण वायदंडे, विलास त्रिंबक धर्माधिकारी (दोघे रा. शनिवारपेठ,सातारा), ज्ञानेश्वर बबन लांडगे (रा.कर्मवीर कॉलनी,सातारा) यांना ताब्यात घेत, त्यांना नोटीस बजावून सोडण्यात आले आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, शहरातील मल्हार पेठ परिसरातील जालींदर तपासे यांच्या घराशेजारी असलेल्या पत्र्याच्या शेडच्या आडोशाला काहीजण पैशावर जुगार खेळत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे यांना मिळाली होती. त्यानुसार मांजरे यांनी पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब कदम यांच्या पथकाला कारवाई करण्याबाबत सुचना केल्या होत्या. कदम व सहकऱ्यांनी माहिती मिळालेल्या ठिकाणी छापा टाकला असता, वरील सर्व संशयित हे जुगार खेळत असल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने त्यांच्याकडील रोख रक्कम व जुगाराचे साहित्य पोलिसांनी ताब्यात घेत, संशयितांच्यावर गुुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सातारा शहर पोलीस करत आहेत.