पुलाची शिरोली / वार्ताहर
करवीर तालुक्यातील सादळे मादळेसह परिसरातील लोकांचे श्रध्दास्थान असलेले ग्राम दैवत सिध्देश्वर मंदिरातील शिवलिंगाची चोरी झाली आहे. तेथे असलेल्या अन्य वस्तूंची चोरी न करता शिवलिंगाच्या सोळंकीची चोरी केली असल्याने हे अघोरी क्रत्य करण्याच्या उद्देशाने तांत्रिक मांत्रिकां सारख्या लोकांनी हि चोरी केली असल्याची ग्रामस्थांच्यात चर्चा सुरु आहे. मंदिरातील या चोरीने परिसरातील भाविकांच्यात खळबळ उडाली आहे. हि घटना रविवारी सकाळी पुजा करण्यासाठी गेलेले बाबासाहेब पाटील यांच्या मुलाच्या निदर्शनास आली.
दरम्यान या घटनेबाबत सादळे गावातील ग्रामस्थांनी रविवारी रात्री उशिरा बैठक घेऊन सोमवारी याची शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.