होबार्ट ओपनचे पटकावले जेतेपद
वृत्तसंस्था/ होबार्ट
भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाने दोन वर्षांच्या विश्रांतीनंतर धडाक्यात पुनरागमन करत होबार्ट आंतरराष्ट्रीय टेनिस दुहेरी स्पर्धेचे जेतेपद पटकावले. 33 वषीय सानियाने तिची युपेनची सहकारी खेळाडू नादिया किचेनोक हिच्यासोबत उत्तम कागिरीचे प्रदर्शन केले. विशेष म्हणजे, महिला दुहेरीतील सानियाचे हे 42 वे जेतेपद ठरले आहे तर, सानिया आई झाल्यानंतर हा पहिलाच किताब आहे.
शनिवारी झालेल्या अंतिम सामन्यात सानिया-नादिया जोडीने चीनच्या झांग शुइ आणि पेंग शुइ जोडीचा 6-4, 6-4 असा पराभव केला. ही अंतिम लढत 1 तास 21 मिनिटे चालला. सुरुवातीपासून सानिया-नादिया जोडीने वर्चस्व गाजवताना प्रतिस्पर्धी जोडीला जराही वरचढ होण्याची संधी दिली नाही. तत्पूर्वी, सानिया-नादिया जोडीने तमारा जिदानसेक आणि मॅरी बुजकोवा यांच्या सुरुवातीच्या संघर्षानंतर 7-6 (3), 6-2 ने मात देत अंतिम सामन्यात प्रवेश केला होता.
सानियाने दोन वर्षांनंतर टेनिस कोर्टवर यशस्वी पुनरागमन केले आहे. होबार्ट इंटरनॅशनल स्पर्धेपूर्वी सानियाने ऑक्टोबर 2017 मध्ये आपली शेवटची स्पर्धा खेळली होती. सानिया टेनिसपासून दोन वर्षे दूर होती. या काळात तिने बाळाला जन्म दिला. आता, सुपर मॉम झाल्यानंतर होबार्ट ओपन स्पर्धेचे जेतेपद पटकावत नव्या वर्षाची जोरदार सुरुवात केली आहे.