देशमुखनगर/प्रतिनिधी
गौण खनिज यासाठी प्रसिद्ध असलेले अपशिंगे मंडल या मंडळांमध्ये नेहमीच गौण खनिजाची लुट होताना दिसून असून याचा प्रत्यक्ष अनुभव माजगाव ता. सातारा येथील जनतेला आला असून येथील एका विकास कामासाठी सामाजिक वनीकरणाच्या हद्दीतील शेकडो ब्रास मुरुम रातोरात गायब झालेला आहे. अनेक रात्री या मुरमाची लूट महसूल विभागातील मंडल अपशिंगे मंडलात असलेल्या अधिकारी व कर्मचारी यांच्या वरदहस्ताने चालू असल्याची चर्चा येथील जनतेत दबक्या आवाजात ग्रामस्थांमध्ये चालत आहे.
शेकडो ब्रास मुरमाची उत्खनन राजरोसपणे चालू असून यावर प्रशासनाचे एवढी डोळेझाक का ? असा सवाल येथील जनतेतून होत आहे. याबाबत अधिक माहिती अशी की माजगाव ता. सातारा येथील तरवडीच्या माळावर असलेल्या सार्वजनिक वनिकरनाच्या हद्दित गेले अनेक दिवसांपासून अवैद्य उत्खनन चालू असून हे उत्खनन महसूल विभागाच्या मेहेरबानीने चालू असल्याची चर्चा येथील जनतेतून दबक्या आवाजात होताना दिसत आहे. या गावांमध्ये विकास कामाच्या नावावर हा मुरूम पळवला जात असून याचा विना राँयलटिचा या मुरमाचा वापर करून शासनाकडून दुहेरी लाभ घेतला जात आहे. सार्वजनिक वनीकरणाच्या वृक्षारोपण केलेल्या जमिनीवर होत असलेली एवढ्या मोठ्या उत्खननावर ना वनविभागाचे लक्ष ना महसूलचे लक्ष. यामुळे शासनाचा महसूल बुडवला जात आहेच, परंतु संबंधित विकास कामासाठी वापरलेल्या मुरमाचे पैसे शासनाकडून लीलया खिशात घालन्याचा धंदा जोमात सुरू आहे. आणि या उत्खणनात जबाबदार असलेले झारीतील शुक्राचार्य कोन आणि त्यांच्यावर कारवाई होनार का ?
यावर जिल्हाधिकारी यांनी याची सखोल चौकशी करावी आणि अशा अवैध प्रकाराला खतपाणी घालणारे शासकीय अधिकारी यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी जनतेतून होत आहे. विशेष म्हणजे या वनीकरणाच्या जमिनीवर वृक्षारोपण झालेले आहे यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी शासनाकडून खर्च झालेला असून याच ठिकाणी हे अवैध उत्खनन झाल्याचे दिसते आहे