प्रतिनिधी/ सातारा
जिह्याचे पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी पदभार स्वीकारला आहे.त्याच दिवशी त्यांनी हारतुरे स्वागत सोहळा करून लगेच जिह्याचा आढावा घेतला.तर सातारा विभागाला लाभलेल्या सह पोलीस अधीक्षक ऑचल दलाल या ऍक्शन मोडवर काम करण्यासाठी त्यांनी नवीन फॉर्म्युला तयार केला आहे.त्यामुळे जिह्यात पोलीस अधीक्षक अजयकुमार यांची अजय पोलिसिंग तर सातारा विभागल्या गुन्हेगारांना ऑचल आठवणार आहे.
पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी कुटूंब प्रमुख म्हणून काम केले.तत्पूर्वी पोलीस अधीक्षक असलेले संदीप पाटील यांनी गडचिरोली येथून येऊन मोक्का कायद्याची शंभरी केली होती.त्यांनी अनेक प्रकरणे चांगली हाताळली अगदी मराठा क्रांती मोर्चासारखी, अभिनव देशमुख, पंकज देशमुख यांच्यासह आतापर्यंत झालेल्या पोलीस अधीक्षकांनी आपला ठसा उमटवला आहे.वेगळी छाप उमटवली आहे.मग प्रकाश मुत्याल असतील की चंद्रकांत कुंभार असतील.अजयकुमार बन्सल यांनी पदभार स्वीकारताच व पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी जाताजाता सुखद धक्का दिला तो मल्हारपेठ पोलीस ठाणे केल्याचा.बन्सल यांनी जिह्यातल्या सर्व पोलीस ठाण्यातल्या अधिकायांची क्राईम मिटिंग घेत आढावा जाणून घेत आहेत.प्रत्येक अधिकायाकडून आपल्या पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात किती गुन्हे घडत आहेत, कोणत्या प्रकारचे गुन्हे वाढत आहेत याचा आढावा घेतला.क्राईम रेट कसा कमी आणता येईल याच्या ते सूचना देत आहेत.
सातारा विभागाच्या उपअधीक्षक म्हणून कार्यभार पहात असलेल्या आंचल दलाल या जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या सख्या भगिनी आहेत.2018मध्ये त्या आयपीएस म्हणून रुजू झाल्या आहेत.त्या अतिशय हुशार अधिकारी असून सातारा विभागातल्या गुन्हेगारांना वठणीवर आणण्यासाठी एक वेगळा फॉर्म्युला तयार केला असल्याचे समजते. बदली झालेले पोलीस उपअधीक्षक समीर शेख यांच्यापेक्षा ही वेगळा फॉर्म्युला त्यांनी तयार केला आहे.सातारा विभागात कुठं कुठं दोन नंबर व्यवसाय चालतात.कोणाची दहशत आहे, कोणाचा राजकीय वरदहस्त कोणा गुंडाच्या पाठीशी आहे, त्यावर काय उपाय योजना करायच्या त्याची सगळी कुंडलीच त्यांनी बनवली आहे.तसेच पोलिसांच्या वसाहतीच्या कामाचे कुठं पर्यंत आले आहे त्यांची त्यांनीं माहिती घेतली आहे.त्यामुळे सातारा विभागतले फळकूट भाई, चिरकूट दादा, लूटमार गँग, मटका बुकीं अशा सगळ्यांचे बस्तान उठवले जाणार आहे.जे नव्याने गुन्हेगारीकडे वळले आहेत त्यांच्याही मुसक्या आवळण्याचा कार्यक्रम सुरू होणार आहे.
जिह्यातले शेख, गुरव बदलून गेले पाटील आले
सहाय्यक पोलीस अधीक्षक समीर शेख यांची पदोन्नती बदली गडचिरोली येथे अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून झाली आहे.त्यांच्या जागी मागच्या आठवडय़ात आंचल दलाल या आल्या आहेत.डॉ. रणजित पाटील कराड चे नवे डीवायएसपी आले असून कराडचे डीवायएसपी सुरज गुरव यांची पुणे लाचलुचपतच्या अपर पोलीस अधिक्षकपदी बदली झाली आहे.