ओटवणे /प्रतिनिधी-
सावंतवाडीतील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्यावतीने आरोंदा गावातील कातकरी समाज तसेच वेंगुर्ले तालुक्यातील रेडी गावातील गरजुंना छत्र्यांचे वितरण करण्यात आले.
सिंधुमित्र प्रतिष्ठानच्यावतीने दरवर्षी सावंतवाडी तालुक्यातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना छत्र्यांचे वितरण करण्यात येते. यावर्षी कोरोना संकटामुळे शाळा बंद असल्यामुळे कातकरी समाजासह गरजू व्यक्तींना छत्र्यांचे यांचे वितरण करण्यात आले.यावेळी आरोंदा गावातील कातकरी समाजासह रेडी येथील गरजुं व्यक्तींनी सिंधुमित्र प्रतिष्ठानचे आभार मानले.
यावेळी प्रतिष्ठानचे सचिव भार्गवराम शिरोडकर, सहसचिव अँड्र्यू फर्नांडिस, सदस्या अनघा शिरोडकर तसेच रेडी गावचे पोलीस पाटील जितेंद्र जाधव, अमित नाईक, महादेवराव मराठे व सौरभ नागोळकर उपस्थित होते.