28 डीआय 59 नवनीत पाटील (मध्यभागी) यांच्यासमवेत शो माडेल्स
प्रतिनिधी / बेळगाव
सभ्यता जपणाऱया पोषाखाने व्यक्तीमत्व खुलून उठते, याचे प्रत्यंतर देणारा ‘सिरिंडीपिटी’ (मजिकल डिस्कव्हरी) हा फशन शो गुरूवारी हाटेल संकमच्या सभागृहात शानदारपणे पार पडला. नवनीत पाटील या फशन डिझायनर तरुणाच्या संकल्पनेतून हा फशन शो सादर झाला.
नवनीत पाटील हे फाईन आर्टस्चे पदवीधर असून त्यांनी फशन टेक्नॉलाजीचे शिक्षण घेतले आहे. नाहीद मर्चंट व संगीता देसाई या मुंबईतील नामवंत डिझायर्सना त्यांनी सहाय्य केले आहे. शिवाय फशन क्षेत्रातील राष्ट्रीय शिष्यवृत्ती त्यांना प्राप्त झाली आहे. रहेजा टेक्नीकल इन्स्टिटय़ूट ऍन्ड स्कूल आफ आर्ट मुंबई येथे फशन टेक्नॉलाजी विभागाचे प्रमुख म्हणून त्यांनी काम केले.
ते मुळचे बेळगावचे असून लाकडाऊन काळात त्यांना या फशन शोची कल्पना सुचली आणि तळागाळातील कुशल कामगारांना काम मिळावे तसेच कोरोना नंतर एक आशा डिझायनर्स आणि माडेल यांच्या मनात पेरावी या हेतुने त्यांनी या शोसाठी पोषाखाचे डिझाईन केले. या शोसाठी त्यांनी ‘जर्सी फब्रीक’ची निवड केली. तसेच उन्हाळय़ात व वसंत ऋतुमध्ये घालता येतील असे सुटसुटीत परंतु लक्षवेधी पोषाख त्यांनी तयार केले.
याच पोषाखांचे सादरीकरण राकेश वाधवा, मुरली शिंदे, जयशिल एम., श्रुती हलभांवी, शीबा बटरफ्लाय, पूजा ओझा, भूमी ओझा, काजल सनदी, तेजस्वी पाटील, हर्शिणी देसाई, शांभवी देशपांडे या माडेल्सनी केले. सेट आणि लाईट डिझाईन क्रिएटीव्ह वर्क्सचे होते. केशरचना आणि रंगभूषा स्मीता कदम, पोषाखाची निर्मिती परमीत कौर कौन्सल यांची होती. शोसाठी लश व ट्रकल म्युझीक यांची होती. शोचे आयोजन संध्या पाटील यांनी केले. यासाठी भक्तीवेदा ढौल यांचे सहकार्य लाभले.