जिल्हाधिकाऱयांनी घेतली अधिकाऱयांची बैठक, 350 बेड राखीव ठेवण्याची सूचना, तरुण भारतची दखल
प्रतिनिधी/ बेळगाव
सिव्हिल हॉस्पिटलमधील गैरकारभार, मनमानी व गलथानपणावर शनिवारी तरुण भारतने प्रकाश टाकला होता. तेथील व्यवस्था कोलमडली आहे. याकडे जिल्हाधिकाऱयांचे लक्ष वेधले होते. शनिवारी सकाळी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी सिव्हिल हॉस्पिटलला भेट देवून अधिकाऱयांची बैठक घेतली आहे. याबरोबरच कोरोना रुग्णांसाठी 350 बेड शिल्लक ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत.
23 वषीय डॉक्टर तरुणीला कोरोनाची लागण झाल्याने मेडीकल ओपीडी दोन दिवस बंद ठेवण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱयांनी ओपीडीसह इतर विभागांना भेटी देवून तेथील व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी बिम्स्चे वैद्यकीय संचालक विनय दास्तीकोप, वैद्यकीय अधिक्षक डॉ. गिरीश दंडगी आदी अधिकाऱयांनी जिल्हाधिकाऱयांना सद्य परिस्थितीची माहिती दिली.
सध्या कोरोना रुग्णांवर उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 200 बेड राखीव ठेवण्यात आले आहे. सारी रुग्णांवर उपचारासाठी 25 बेड उपलब्ध आहेत. गेल्या आठवडय़ाभरात वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन कोरोना बाधितांसाठी 350 बेड राखीव ठेवण्याची सूचना जिल्हाधिकाऱयांनी केली आहे. जर या सुचनेचे पालन झाले तर सिव्हिलमध्ये यापुढे अन्य रुग्णांवर उपचार होणे कठीण जाणार आहे.
सध्या प्रसुती विभाग व्यवस्थीतपणे सुरु आहे. हा एक विभाग वगळता आर्थोपेडीक, सर्जरी, मेडीकल या सर्व विभागात कोरोना रुग्णांसाठी बेड राखीव ठेवण्यासाठी हालचाली सुरु आहेत. ट्रॉमा विभागात सध्या कोरोना बाधितांना दाखल करण्यात आले आहे. आता जवळजवळ संपूर्ण सिव्हिल हॉस्पिटल कोरोना बाधितांसाठीच राखीव ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
बिम्स्मधील गलथान कारभाराचा फटका तेथील वैद्यकीय कर्मचारी, परिचारीका व डॉक्टरांना बसला आहे. यासंबंधी तरुण भारतने शनिवारी सविस्तर वृत्त प्रसिध्द केले होते. काही ज्युनिअर डॉक्टरांनी शुक्रवारी जिल्हाधिकाऱयांची भेट घेऊन बिम्स्मध्ये जे काही सुरु आहे याकडे त्यांचे लक्ष वेधले होते. त्यामुळे जिल्हाधिकाऱयांनी शनिवारी त्वरीत सिव्हिल हॉस्पिटलला भेट देवून अधिकाऱयांना त्यांच्या समस्या दूर करण्यासंबंधी सूचना केल्या आहेत.