क्रीडा प्रतिनिधी
बेळगाव चार्टर्ड अकाऊंटट व बेळगाव टॅक्स पॅक्टिन्सर संघटना आयोजित सेंट्रल जीएसटी विभागाच्या चार संघात 10 षटकांच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत बेळगाव चार्टर्ड औकाऊंट अ संघाने टॅक्स पॅक्टिसर्न्स संघाचा 10 धावांनी पराभव करून बेळगाव चार्टर्ड औकाऊंट चषक पटकाविला. सीजीएसटी संघाने तिसऱया क्रमांकावर समाधान मानावे लागले. संदीप काजोळकरला सामनावीर व मालिकावीराचा बहुमान पटकाविला.
युनियन जिमखाना मैदानावर उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जीएसटी विभागाचे आयुक्त डॉ. शिवाजी डांगे, सहआयुक्त राजेश रामाराव, चेअमरन सीए विभाग सतिश मेहता, सचिव एम. एस. तिगडी, राहुल अडके, सुदेंद घाळी, एम. एम. हनगडी, बी. बी. चंदरगी, प्रविण घाळी आदी मान्यवर उपस्थित होते.
पाहुण्यांच्या हस्ते यष्टीचे पूजन व नाणेफेक करून या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात सीए अ संघाने सीजीएसटी संघाचा 17 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना सीए अ संघाने 10 षटकात 5 गडी बाद 82 धावा केल्या. त्याला उत्तर देताना सीजीएसटी संघाने 9.5 षटकात सर्वबाद 72 धावा केल्या. दुसऱया उपांत्य फेरीच्या सामन्यात टॅक्स पॅक्टिन्सर संघाने सीए ब संघाचा 5 गडय़ांनी पराभव केला. सीए ब संघाने 10 षटकात 6 गडी बाद 66 धावा केल्या. त्याला उत्तर देताना टॅक्स प्रॅक्टिशनर संघाने 8.3 षटकात 5 गडी बाद 67 धावा केल्या.
अंतिम सामन्यात सीए अ संघाने प्रथम फलंदाजी करताना 10 षटकात 5 गडी बाद 82 धावा केल्या त्यात संदिप काजुकरने 2 षटकार 5 चौकारासह 39, वरून केने 19, अभर पै 14, तर विनायक ए ने 10 धावा केल्या. टॅक्स पॅक्टिशनरतर्फे अनिल, गौडर, अमित बी, सुमित यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल टॅक्स पॅक्टिशनर संघाने 10 षटकात 6 गडी बाद 72 धावाच केल्या. त्यात सतिश के ने 2 षटकार 4 चौकारासह 46 धावा केल्या. सीए अ तर्फे अभर पै 2, तेजस, श्रेयस, पराग यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
सामन्यानंतर प्रमुख पाहुणे विश्वचषक अंध भारतीय क्रिकेट संघाचा अंध खेळाडू महांतेश किडसण्णावर, सतीश मेहता, बी. बी. चंदरगी, प्रकाश तिगडी, विशाल पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या सीए अ, उपविजेत्या टॅक्स पॅक्टिशनर व तृतीय क्रमांक पटकाविलेल्या सीजीएसटी संघाला चषक देऊन गौरविण्यात आले. अंतिम सामन्यातील सामनावीर सतिश काकतीकर (टॅक्स) उत्कृष्ट फलंदाज संदिप काजुकर (सीए) उत्कृष्ट गोलंदाज अभय पै (सीए) मालिकावीर संदिप काजुकर (सीए) यांना चषक देऊन गौरविण्यात आले. उमेश यलिगार, सुजित शिरडोळकर यांनी पंच म्हणून काम पाहिले. प्रमोद जपे व आरीप बाळेकुंद्री यांनी स्पर्धेचे समालोचन केले.