शारजाह
: आयपीएल स्पर्धेचा एक भाग असलेल्या महिला टी-20 चॅलेंज स्पर्धेतील साखळी सामन्यात सुपरनोव्हाजने प्रतिस्पर्धी ट्रेलब्लेझर्सविरुद्ध 2 धावांनी निसटता विजय संपादन करत अंतिम फेरी गाठली. या संघाने निर्धारित 20 षटकात 6 बाद 146 धावांची मजल मारली. त्यानंतर ट्रेलब्लेझर्सला 5 बाद 144 धावा करता आल्या.
सुपरनोव्हाजतर्फे लंकन फलंदाज चमारी अटापट्टूने 48 चेंडूत 67 धावांची आतषबाजी केली. तिच्या या धडाकेबाज अर्धशतकी खेळीत 5 चौकार व 4 उत्तूंग षटकारांचा समावेश राहिला. हरमनप्रीत कौरने 29 चेंडूत 31 धावा केल्या तर प्रिया पुनियाने 37 चेंडूत 30 धावा जोडल्या.