ओरोस/ प्रतिनिधी-
जिल्हा रुग्णालय ओरोस येथे पोलिस बांधव तसेच सुरक्षा एजंसीचे कर्मचारी मागील जवळपास दिड वर्षांपासून जिल्हा रुग्णालयाच्या गेटवर एक तंबू बांधून आपली सेवा बजावत आहेत. कोरोनाच्या कालावधी मध्ये जिल्हा आरोग्य प्रशासनाने कोट्यावधी रुपये खर्च केलेत परंतु आपल्याच जिल्हा रुग्णालयाच्या गेटवर तंबूत राहून दिवसरात्र सेवा बजावणाऱ्या या पोलिस बांधवांचा व भगिनींचा प्रशासनाने मात्र कोणताही विचार केला नाही ही बाब क्लेशदायक आहे.
जनतेसाठी आपल्या जिवाची पर्वा न करता सतत झटणाऱ्या या पोलिस बांधवांसाठी एक पत्र्याची शेड तात्काळ प्रशासनाने उभारावी जेणेकरून ऊन पाऊसापासून संरक्षण होईल अशी मागणी करत मनसेचे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले आहेत.यावेळी आशिष सुभेदार,अमोल जंगले उपस्थित होते.