ऑनलाईन टीम / मुंबई :
सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आल्यानंतर तपासाला गती मिळाली आहे. याआधी सीबीआयने सुशांतचा मित्र सिद्धार्थ पठाणी आणि सुशांतच्या स्टाफ मधील त्याचा कूक नीरज सिंह आही हेल्पर दिनेश सावंत यांची चौकशी केली आहे.
मात्र, या सगळ्यांच्या जबाबामध्ये विरोधाभास असल्याने आज पुन्हा एकटा या तिघांना सोबत घेऊन सीबीआयची टीम चौकशीसाठी अंधेरी पूर्व मधील व वॉटर स्टॉन हॉटेल येथे पोहोचली आहे.
- सीबीआयकडून रिया सेनला समन्स
तसेच सीबीआय कडून सुशांत सिंह राजपूत ची कथित प्रेयसी रिया सेन आणि तिच्या वडिलांना समन्स बजावण्यात आला आहे. मात्र रिया यांच्या वकिलांनी सांगितले की, रिया यांना अजून समन्स मिळालेला नाही. समन्स मिळाल्यास चौकशीला सामोरे जाऊ, असेेेही स्पष्ट केले आहे.
दरम्यान, डीआरडीओ गेस्ट हाऊसमध्ये फॉरेन्सिक टीम आणि मुंबई पोलिसांचीही एक टीम पोहोचली आहे. तर सीबीआयची एक टीम पुन्हा सुशांतच्या घरी पोहोचली आहे.