युक्रेनमध्ये गुगल मॅप्सचा लाइव्ह ट्रफिक डाटा बंद
दिग्गज तंत्रज्ञान कंपनी गुगलने युजर्सच्या सुरक्षेसाठी युक्रेनमध्ये स्वतःच्या मॅप्सच्या लाइव्ह ट्रफिक डाटाला तात्पुरत्या स्वरुपात बंद केले आहे. युक्रेनला सध्या रशियाच्या आक्रमणाला सामोरे जावे लागत आहे. गुगलने मॅप्सच्या लाइव्ह टॅफिक डाटाला कधी बंद केले हे अद्याप समोर आलेले नाही.
क्षेत्रीय अधिकाऱयांसह स्रोतांच्या सल्लामसलतीनंतर स्थानिक युक्रेनियन समुदायांच्या सुरक्षेसाठी हे पाऊल उचलल्याचे गुगलकडून म्हटले गेले आहे. डाटा ऍपसोबत स्मार्टफोनद्वारे स्थान आणि वेगाची माहिती सामील करून काम करतो, मग त्याचा वापर प्रत्यक्षवेळेत काही ठिकाणी ट्रफिकची स्थिती कशी आहे किंवा संबंधित परिसरात किती वाहने आहेत हे दर्शविण्यासाठी याच वापर होतो.
हिटलरचे 309 सैनिक मारणाऱया स्नायपरची कहाणी
युक्रेनचा सैन्यदल रशियाच्या आक्रमणाला रोखण्यासाठी कूच करत आहे. या सैन्यदलाचे मागून घेण्यात आलेल्या छायाचित्रात सर्वांच्या नजरा एका सूर्यफुलावर पींत होत आहेत. एका महिला सैनिकाने केसात सूर्यफल माळले होते. सूर्यफुलात युक्रेनचा आत्मा वास करून असतो. हे राष्ट्रीय फुल आहे. युक्रेन एक हरलेली लढाई लढत असला तरीही निकराने प्रतिकार करत आहे. युक्रेनच्या सैन्यात सुमारे 17 टक्के महिला असून त्या ल्यूडमिला पवलिचेंको यांची आठवण करून देतात.
जर्मन सैनिकांचा काळ होती…
‘जर तू भेटलीस तर आम्ही तुझे 309 तुकडे करून हवेत उडवू’ दुसऱया महायुद्धात जर्मन सैनिकांची ही इच्छा कधीच पूर्ण होऊ शकली नाही. ती कधीच त्यांच्या हाती लागली नाही. उलट जर्मनीवरून उड्डाण करत कित्येक वर्षांपर्यंत त्यांच्या जखमांवर मीठ चोळत राहिली. 24 वर्षीय युक्रेनियन तरुणीने दुसऱया महायुद्धात जर्मनीच्या 309 सैनिकांना वेचून वेचून ठार केले होते.
ती स्टॅलिनची परी होती…
1940, 1941 मध्ये सोव्हिएत संघ अस्तित्वात होता. आता युक्रेनची राजधानी असलेल्या कीव्हमध्ये हिटलरचे सैन्य पोहोचले होते. कीव्हच्या एका गावात जन्मलेली ल्यूडमिला पवलिचेंकाने सूडाच्या आगीत हिटलरच्या सैन्याच्या विरोधात अशी कामगिरी केली, ज्याचे किस्से 80 वर्षांनंतरही ऐकविले जातात. ती स्टॅलिनसाठी परी होती, तिला लेडी डेथ म्हटले जायचे. जगाच्या इतिहासात सर्वात धोकादायक महिला स्नायपरचा मान तिला मिळाला. ल्यूडमिला यांना निशाणेबाजीसह आठवणी लिहिण्याची सवय होती.
हिटलरचा हल्ला
जून 1941 मध्ये हिटलरच्या सैन्याने सोव्हिएत संघावर ऑपरेशन बार्बारोसाद्वारे हल्ला केला. सुमारे 6-7 आठवडय़ांनी 8 ऑगस्ट 1941 रोजी ल्यूडमिलाला स्नायपर म्हणून संधी मिळाली. परंतु याकरता तिला विश्वास मिळविण्यासाठी दोन जर्मन आणि रोमानियन सैनिकांचा जीव घ्यायचा होता.
17 गोळय़ांनी मारले 16 सैनिक
ल्यूडमिलाच्या डायरीत ओदेसा आणि सेवेतोवालच्या युद्धभूमीचा उल्लेख आहे. युद्ध किती क्रूर असते याचे चित्रण आहे. जर्मन सैनिकांना भयभीत करण्यासाठी त्यांच्या पोटात गोळय़ा घालायचे. जर्मन सैनिकाच्या पायावर गोळी मारल्यावर त्याला उचलण्यासाठी येणाऱया इतर सैनिकांना ठार करण्याची घटना देखील तिच्या डायरीत नमूद आहे. ल्यूडमिलाने एका दिवसात 17 शॉट्समध्ये 16 सैनिक ठार केले होते. या युद्धात सोव्हिएत संघाच्या 2 हजार महिला स्नायपर्सपैकी 500 जणीच बचावल्या होत्या आणि यात ल्यूडमिलाचा समावेश होता.