नवी दिल्ली
सॅमसंग कंपनीने आपला नव्या दमाचा 8 के व 4 के नीओ क्युएलइडी टीव्ही भारतीय बाजारात सादर केला आहे. सदरच्या टीव्हीची किंमत 99 हजार 990 रुपये इतकी असणार आहे. नीओ क्युएलइडी टीव्ही हे मिनी एलइडी बॅकलाइटिंग तंत्रज्ञानावर आधारीत एलसीडीच्या तुलनेत अधिक अत्य़ुत्तम ठरणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. 85 इंच, 75, 65 व 55 इंचाचे टीव्ही सादर करण्यात आले आहेत. 15 एप्रिलला टीव्हीचे प्री-बुकिंग सुरू झाले असून 19 एप्रिलपासून फ्लिपकार्ट, ऍमेझॉन आणि इलेक्ट्रॉनिक स्टोअर्सवर प्री-बुकिंग सुरू झाले आहे.