प्रतिनिधी/ बेळगाव
सैन्य भरती कार्यालय बेळगावतर्फे 1 फेब्रुवारी ते 31 मार्च 2021 दरम्यान सैन्यातील शिपाई (जीडी) सह विविध पदांसाठी भरती मेळावा होणार आहे. शिपाई पदासाठी किमान 10 वी उत्तीर्ण व 45 टक्के गुण आवश्यक आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. नोंदणी झालेल्या उमेदवारांनाच भरतीसाठी प्रवेश मिळेल.
या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी 5 डिसेंबर 2020 ते 18 जानेवारी 2021 दरम्यान ऑनलाईन नोंदणी करावी लागेल. शिपाई पदासाठी इच्छुक उमेदवाराचा जन्म 1 ऑक्टोबर 1998 ते 1 एप्रिल 2002 दरम्यानचा असावा. उंची 166 सें. मी, छाती 77 सें. मी. फुगवून 5 सें. मी. हा निकष आहे. उमेदवाराला दहावी परीक्षेत 45 टक्के गुण मिळालेले असणे आवश्यक आहेत.