वृत्तसंस्था /नवी दिल्ली
सोनालिका या समूहाने शेतकऱयांसाठी उच्च दर्जाची असणारी शेतीविषयक मशिनरी, ट्रक्टर भाडय़ाने देण्यासाठी एका ऍपची निर्मिती केली असून सदर ऍपचे सादरीकरण करण्यात आले असल्याची माहिती गुरुवारी सोनालिकाकडून देण्यात आली आहे.
सोनालिकाने ‘सोनालिका ऍग्रो सॉल्यूशन्स’ ऍप सादर केले आहे. या ऍपच्या मदतीने शेतकऱयांना शेतीसाठी आवश्यक असणाऱया मशिनरी भाडय़ाने देण्यात येणार आहेत. आपल्या जवळपासच्या क्षेत्रात उच्च दर्जाची उपलब्ध असणारी कृषी उपकरणे भाडय़ाने शेतकऱयांना घेण्यास या ऍपची मोठी मदत होणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
शेतकऱयांसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म
सोनालिकाने शेतकऱयांसाठी शेतीविषयक मशिनरी, ट्रक्टर व अन्य उपकरणे उपलब्ध करुन ती भाडय़ाने देणार असल्याचे म्हटले आहे. शेतकऱयांसाठी डिजिटल प्लॅटफॉर्मच्या युगात ही विशेष सुविधा उपलब्ध करून ऍपद्वारे सुविधा देण्यावर कंपनी भर देणार असल्याचे मत सोनालिका समूहाचे कार्यकारी संचालक रमन मित्तल यांनी व्यक्त केले आहे.