नवी दिल्ली
आंतरराष्ट्रीय बाजारात मागील 40 दिवसांमध्ये सोन्याच्या किमती 5.6 टक्क्यांनी वधारुन तीन महिन्यांच्या उंचीवर पोहोचल्या आहेत. न्यूयॉर्कमध्ये मंगळवारी सोने हे 0.07 टक्क्यांच्या तेजीसोबत 1,825.84 डॉलरवर आउंस विक्री झाला आहे. सहा सप्टेंबर रोजी हा आकडा 1,828.10 डॉलरवर होता.
याच दरम्यान रुपयामध्ये आलेल्या मजबूतीसह देशातील बाजारात सोन्याच्या किमतीवर आंतरराष्ट्रीय बाजारात तेजीचा प्रभाव झाला नव्हता. मंगळवारी मात्र 24 कॅरेट सोने 170 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि दागिन्याचे सोने (22कॅरेट)146 रुपयांनी महाग झाले आहे.
मागणीचा कल वाढताच
डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाल्याने देशातील बाजारातील सोन्याचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारात तेजीत होते. परंतु आता सणासुदीसोबत लग्नसोहळा सुरु होत असल्याने ग्राहकांची प्रत्यक्ष सोने मागणीत मोठी मागणी राहणार असल्याचे केडिया ऍडव्हायजरचे संचालक अजय केडिया यांनी सांगितले आहे.
का आली तेजी
फेडरल रिझर्व्हने बॉण्ड बायिंग प्रोग्रॅममध्ये कपात करण्याचा प्रयत्न केला आहे
बॉण्ड यील्ड आणि डॉलर इंडेक्समध्ये मोठी तेजी आली नाही
चीन आणि भारतात प्रत्यक्ष सोने मागणी मजबूत होतेय