सोमनाथ
गुजरातच्या गिर सोमनाथ जिल्हय़ात रविवार रात्री उशिरापासून सोमवार सकाळपर्यंत 1.7 ते 3.3 तीव्रतेचे भूकंपाचे 19 धक्के जाणवले आहेत. भूकंपाच्या या धक्क्यांमुळे कुठलीच जीवितहानी झाली नसल्याचे अधिकाऱयांनी सांगितले आहे. मान्सूनमुळे या भूकंपीय हालचाली असून ज्या दोन-तीन महिन्यांच्या अतिवृष्टीनंतर गुजरातच्या सौराष्ट्र क्षेत्राच्या काही भागांमध्ये आढळून येत असल्याची माहिती गांधीनगर येथील भूकंप संशोधन संस्थेच्या अधिकाऱयाने दिली आहे. भूकंपाच्या या धक्क्यांमुळे चिंता करू नये. रविवारी रात्री 1 वाजून 42 मिनिटापांसून 19 वेळा भूकंपाचे धक्के बसले आहेत, या भूकंपाचे केंद्र गिर सोमनाथ जिल्हय़ातील तालालानजीक होते, असेही अधिकाऱयाने म्हटले आहे.
बहुतांश भूकंपाच्या धक्क्यांची तीव्रता 3 पेक्षा कमी होती, परंतु 6 वेळा तीनहून अधिक तीव्रतेचे धक्के जाणवले आहेत.