आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं
एक मराठा, लाख मराठाच्या घोषणा
तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याच्या विरोधात आज शुक्रवारी सोलापुरातील मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने आंदोलन करण्यात आले. एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं असं कसा देत नाही घेतल्याशिवाय राहात नाही, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. दरम्यान आंदोलन करताना पोलिसांच्या वतीने मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली.
यावेळी मराठा क्रांती मोर्चा समन्वयक राम जाधव, समनव्यक किरण पवार ,ओम घाडगे, अजिंक्य पाटील आदीना अटक करण्यात आली.