तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण, नगरपालिका भागात आज सोमवारी 513 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये 317 पुरुष, 196 स्त्रियांचा समावेश आहे. आज 16 तर आतापर्यंत 411 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण 14 हजार 185 कोरोनाबाधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित 4 हजार 275 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी जमादार यांनी दिली.
जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने आज कोरोना बाधितांचा अहवाल दिला आहे. आज 3017 जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील 2504 अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 513 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. 14 हजार 185 रुग्णांपैकी 8 हजार 643 पुरुष, 5 हजार 542 स्त्रिया आहेत. तर आतापर्यंत 411 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण 9 हजार 499 जण बरे होऊन घरी गेले आहेत.
कोरोनाबाधितांची संख्या पुढील प्रमाणे –
अक्कलकोट – 737
मंगळवेढा- 574
बार्शी – 2696
माढा – 1275
माळशिरस – 1793
मोहोळ – 691
उत्तर सोलापूर – 559
करमाळा – 873
सांगोला – 758
पंढरपूर – 3146
दक्षिण सोलापूर – 1083
एकूण – 14185
होम क्वांरटाईन – 6514
आजपर्यंत तपासणी केलेली व्यक्ती- 111668
प्राप्त अहवाल- 111531
प्रलंबित अहवाल- 137
एकूण निगेटिव्ह – 97346
कोरोनाबाधितांची संख्या- 14185
रुग्णालयात दाखल – 4275
आतापर्यंत बरे – 9499
मृत – 411