सोलापूर / तरुण भारत संवाद प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण, नगरपालिका भागात आज रविवारी 93 नवे कोरोनाबाधित पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली असून यापैकी 56 पुरुष, 37 स्त्रियांचा समावेश आहे. आज 3 तर आतापर्यंत 1036 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण 35 हजार 330 कोरोनाबाधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित 1 हजार 726 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शितलकुमार जाधव यांनी दिली.
जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने आज कोरोना बाधितांचा अहवाल दिला आहे. आज 2270जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील 217अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 93 पॉझिटिव्ह आढळल्या आहे. आतापर्यंत 1036 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण 32 हजार 568जण बरे होऊन घरी गेली आहेत.
कोरोनाबाधितांची संख्या पुढील प्रमाणे
अक्कलकोट – 1154
मंगळवेढा- 1602
बार्शी – 6264
माढा- 3713
माळशिरस – 6429
मोहोळ- 1732
उत्तर सोलापूर – 782
करमाळा- 2144
सांगोला – 2735
पंढरपूर 7258
दक्षिण सोलापूर – 1517
एकूण – 35, 330
होम क्वांरटाईन – 12091
एकूण तपासणी व्यक्ती- 325857
प्राप्त अहवाल- 325806
प्रलंबित अहवाल- 51
एकूण निगेटिव्ह – 290477
कोरोनाबाधितांची संख्या- 35,330
रुग्णालयात दाखल – 1726
आतापर्यंत बरे – 32,568
मृत – 1036