सोलापूर / तरुण भारत संवाद प्रतिनिधी
पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघासाठी मंगळवारी एक डिसेंबर रोजी मतदान होणार असून 35 शिक्षक उमेदवार तर 65 पदवीधर उमेदवार रिंगणात आहेत. जिल्ह्यातील 197 केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले असून दोन मतदारांमध्ये सहा फुटांचे अंतर असणार असून ज्या मतदारांची 98.6 पेक्षा अधिक तापमान असलेल्या मतदाराला प्रतीक्षा करावी लागणार आहे. वेब कास्टिंगद्वारे प्रत्येक मतदान केंद्रावरील हालचालीवर वॉच राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज रविवारी पत्रकार परिषदेत दिली.
दोन मतदारांमध्ये सहा फुटांचे अंतर असणार आहे. सर्वांची तपासणी करूनच मतदारांना प्रवेश देण्यात येणार आहे. सोलापूर जिल्ह्यात पदवीधर चे 53 हजार 813 तर 13 हजार 584 शिक्षक मतदार आहेत तर 4 लाख 26 हजार 430 तर पदवीधर तर 72 हजार 545 शिक्षक मतदार असल्याचे शंभरकर यांनी सांगितले. मतदान प्रक्रियेसाठी 1 हजार 970 कर्मचारी नियुक्ती करण्यात आली आहे. तर 62 क्षेत्रीय अधिकारी, 168 अधिकाऱ्यांची 42 भरारी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. सूक्ष्म निरीक्षक 217 , आशा वर्कर व वैद्यकीय कर्मचारी 394,197 मतदान केंद्रावर प्रत्येक कर्मचाऱ्यांना मास्क, हॅन्ड ग्लोज , फेशशिल्ड दिले जाणार आहे.
- मतदार यांचे नाव कोणते यादीमध्ये हे शोधण्यासाठी सर्च इंजिन लिंक प्रत्येक तालुक्यातून व जिल्हा कार्यालयात या साईटवर उपलब्ध
- जास्त गर्दी झाल्यास अतिरिक्त मतदारांसाठी असणारे वेटिंग रूम
- सकाळी आठ ते सायंकाळी पाच पर्यंत चालणार मतदान प्रक्रिया
- प्रत्येक मतदान केंद्रावर तापमान तपासण्यासाठी असतील स्वतंत्र दोन कर्मचारी
- मतदाराचे तापमान 98.6 असावे जास्त तापमान असलेल्या करावी लागणार प्रतीक्षा
– प्रत्येक मतदान केंद्रावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सावली, दिव्यांगाना आवश्यक असलेली सुविधा शौचालयाची व्यवस्था करून देण्यात आली आहे.
- ज्या मतदान केंद्र विद्युत पुरवठा खंडित ठेवणे शक्य नसेल त्या ठिकाणी जनरेटरची व्यवस्था
वाहनांची व्यवस्था
बस 24
मिनी बस 30
जिप 14
एकूण 68
पोलीस बंदोबस्त
पुणे व शिक्षक मतदार संघासाठी हे सोलापूर जिल्ह्यातील शहरासाठी 191, ग्रामीणसाठी 1148 असे एकूण 1339 पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. एकूण 41954
मतदान केंद्र 197, थर्मल गन 250 , फेसशिल्ड 3072, हॅन्डग्लोज 12500, मास्क 35000, प्रत्येक मतदान केंद्रावर पाच लिटरचे सॅनिटायझरचे कॅन, साबण 250, हँडवॉश 250