जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव
बरे झाल्याने 182 रुग्णांना सोडले घरी
तरूण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण व नागरी क्षेत्रात शुक्रवारी 146 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. उपचारा दरम्यान सात रुग्णांचा मृत्यू झाला. तर उपचार घेऊन बरे झाल्याने 182 रुग्णांना घरी सोडले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव यांनी शुक्रवारी दिली.
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण व नागरी क्षेत्रात शुक्रवारी 1450 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 146 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर 1304 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 146 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 86 पुरुष आणि 60 स्त्रियांचा समावेश आहे. जिल्ह्यातील ग्रामीण व नागरी क्षेत्रात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 29570 झाली आहे.
-एकूण तपासणी केलेल्या व्यक्ती : 228819
-ग्रामीण भागातील पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती : 29570
-प्राप्त तपासणी अहवाल : 228788
-प्रलंबित तपासणी अहवाल : 31
-निगेटिव्ह अहवाल : 199217
-आजपर्यंत एकूण मृतांची संख्या : 869
-रुग्णालयात दाखल असलेल्या बाधितांची संख्या : 3069
-रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेले बाधितांची संख्या : 25633
तालुका निहाय पॉझिटिव्ह रुग्ण
-अक्कलकोट 1071, बार्शी 5269, करमाळा 2008, माढा 3030, माळशिरस 5147, मंगळवेढा 1366, मोहोळ 1368, उत्तर सोलापूर 719, पंढरपूर 5832, सांगोला 2359, दक्षिण सोलापूर 1402 आणि एकुण 29570