तरूण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर शहारात शुक्रवारी नव्याने 20 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. उपचारादरम्यान दोन रुग्णांचा मृत्यू झाला. तर उपचार घेऊन बरे झाल्याने 42 जणांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी शुक्रवारी दिली.
सोलापूर शहरात शुक्रवारी 281 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 20 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर 261 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 20 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 11 पुरुष तर 9 स्त्रियांचा समावेश आहे. शहरातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 9366 झाली आहे.
एकूण तपासणी केलेल्या व्यक्ती : 89446
शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती : 9366
प्राप्त तपासणी अहवाल : 89446
प्रलंबित तपासणी अहवाल : 00
निगेटिव्ह अहवाल : 80080
आजपर्यंत एकूण मृतांची संख्या : 524
रुग्णालयात दाखल असलेल्या बांधितांची संख्या : 564
रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या बाधितांची संख्या : 8278