तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आज सोमवारी 174 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले, तर 7 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. उपचार घेऊन बरे झाल्याने तब्बल 287 रुग्णांना घरी सोडले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार यांनी दिली.
सोलापुर जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रात 1282 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 174 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह तर 1108 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 174 पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये 91 पुरुष आणि 83 स्त्रियांचा समावेश आहे. जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 7878 झाली आहे.
एकूण तपासणी केलेल्या व्यक्ती 63366
ग्रामीण भागातील पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती 7878
प्राप्त तपासणी अहवाल 63260
प्रलंबित तपासणी अहवाल 106
निगेटिव्ह अहवाल 55383
आजपर्यंत एकूण मृतांची संख्या 220
रुग्णालयात दाखल असलेल्या बांधितांची संख्या 2860
रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेले बाधितांची संख्या 4798