सोलापूर / प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण, नगरपालिका भागात सोमवारी 236 कोरोनाबाधित पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली असून यापैकी 152 पुरुष, 84 स्त्रियांचा समावेश आहे. आज 10 तर आतापर्यंत 725 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण 26 हजार 536 कोरोनाबाधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित 5 हजार 131 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बी.टी जमादार यांनी दिली.
जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने आज कोरोना बाधितांचा अहवाल दिला आहे. आज 1518 जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील 1282 अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 236 पॉझिटिव्ह आढळल्या आहे . आतापर्यंत 725 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण 20 हजार 680 जण बरे होऊन घरी गेली आहेत.
कोरोनाबाधितांची संख्या पुढील प्रमाणे
अक्कलकोट – 1029
मंगळवेढा- 1230
बार्शी – 4904
माढा- 2738
माळशिरस – 4444
मोहोळ- 1123
उत्तर सोलापूर – 693
करमाळा- 1967
सांगोला – 1978
पंढरपूर 559
दक्षिण सोलापूर – 1271