प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण व नागरी क्षेत्रात शुक्रवारी तब्बल 340 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले, तर उपचार घेऊन बरे झाल्याने तब्बल 109 रुग्णांना घरी सोडले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार यांनी शुक्रवारी दिली.
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण व नागरी क्षेत्रात शुक्रवारी 2937 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 340 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह तर 2597 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 340 पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये 207 पुरुष आणि 133 स्त्रियांचा समावेश आहे. जिल्ह्यातील ग्रामीण व नागरी क्षेत्रात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 12848 झाली आहे.
-एकूण तपासणी केलेल्या व्यक्ती : 100789
-ग्रामीण भागातील पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती : 12848
-प्राप्त तपासणी अहवाल : 100660
-प्रलंबित तपासणी अहवाल : 129
-निगेटिव्ह अहवाल : 87811
-आजपर्यंत एकूण मृतांची संख्या : 373
-रुग्णालयात दाखल असलेल्या बांधितांची संख्या : 3485
-रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेले बाधितांची संख्या : 8991
Previous Articleशेतमालाचा व्यापारी व्यवहार
Next Article बोलू काही नवीन शिक्षणाविषयी
Abhijeet Khandekar
Meet Abhijeet Khandekar : a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. With a Master's degree in Journalism from Shivaji University, Abhijeet specializes in political news, entertainment, and local content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives. Connect with Abhijeet for collaborations and captivating content that informs and entertains.