तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
महापालिका हद्दीत रविवारी संध्याकाळी 7 पर्यंत 28 कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. तर 6 जणांचा मृत्यू झाला आहे. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 17 पुरुष तर 11 स्त्रियांचा समावेश आहे. त्यामुळे महापालिका हद्दीतील रुग्णांची एकूण संख्या 1188 असल्याची माहिती, मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी रविवारी दिली.
7 जून रोजी संध्याकाळी 7 पर्यंत एकूण 191 अहवालांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 163 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले, तर 28 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यामध्ये निराळे वस्ती, मुकुंदनगर, सिध्देश्वर पेठ, हनुमान नगर, विजापूर रोड, मड्डी वस्ती, दत्तनगर, बुधवारपेठ, न्यु बुधवारपेठ, रंगभवन चौक, प्रतापनगर, विजापूर रोड, मंत्रीचंडक नगर, भवानी पेठ, पाथरुठ चौक, नरसिंग क्वार्टर, सिव्हील हॉस्पिटल, बुधवारपेठ, वडार गल्ली, अवंतीनगर, जुना पुना नाका, निलमनगर, मसिहा चौक, मरिआई चौक, श्रीकृष्ण वसाहत आणि मॉडर्न हायस्कूल या भागात रुग्ण सापडले आहेत. आतापर्यंत एकूण 107 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 432 पॉझिटिव्ह रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. तर 649 रुग्ण उपचारानंतर बरे होऊन परत गेले आहेत.