ऑनलाईन टीम / कोलकाता :
बीसीसीआयचे (BCCI) अध्यक्ष आणि भारतीय क्रिकेट संघातील माजी खेळाडू सौरव गांगुली यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. वुडलँड्स रुग्णालयातून अधिकृत पत्रक प्रसिद्ध करत ही बातमी प्रथमत: जाहीर करण्यात आली.
दरम्यान, 2 जानेवारीला गांगुली यांना व्यायाम करतेवेळी हृदयविकाराचा हलका झटका आला होता. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर एन्जिओप्लास्टी करण्यात आली होती. त्यानंतर आज गांगुलीला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
यानंतर माध्यमांशी बोलताना सौरव गांगुली म्हणाले, येत्या काळात आपण लवकरच काम पुन्हा सुरु करणार असल्याचे सांगितले.
पुढे ते म्हणाले, हा आयुष्याचाच एक भाग आहे. गोष्टी घडतच राहतात. पण, आता मी पूर्णपणे बरा आहे. किंबहुना येत्या काही दिवसांमध्येच या परिस्थितीवर माझे शरीर कशा पद्धतीने उत्तर देते हे पाहत मी कामाला सुरुवात करणार आहे.