नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशात लसीकरण मोहिमेला पुढच्या महिन्यापासून अधिक वेग मिळणार असल्याची शक्मयता आहे. येत्या सप्टेंबर महिन्यात देशात सिंगल डोस असणारी ‘स्?पुटनिक-लाईट’ लस उपलब्ध होणार आहे. ही लस सुरुवातीला मर्यादित प्रमाणात उपलब्ध केली जाणार असून त्याची किंमत 750 रुपये असण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
‘स्?पुटनिक-लाईट’ ही लस गामलेया इन्स्टिटय़ूटने विकसित केली आहे. तर चाचणीमध्ये ही लस 80 टक्के यशस्वी ठरली आहे. मे महिन्यात ही लस रशियामध्ये आपत्कालीन वापरासाठी मंजूर करण्यात आली होती. पॅनेसिया बायोटेकने अलीकडेच भारताच्या ड्रग्ज रेग्युलेटरीसमोर अर्ज सादर केला आहे. यामध्ये आपत्कालीन वापराची परवानगी मागितली होती. पॅनेसिया आणि रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड (आरडीआयएफ) यांच्यात या लसनिर्मितीसंबंधी आधीच भागिदारी झाली आहे.
पुढील महिन्यापासून ‘स्?पुटनिक-लाईट’ ही लस उपलब्ध झाल्यास तिसऱया लाटेच्या धोक्मयाच्या दरम्यान ती खूप उपयोगी पडू शकते. सध्या दोन-डोस असलेसी ‘स्?पुटनिक-व्ही’ लस वापरली जात आहे. हैदराबादस्थित डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजवर ही लस भारतात देण्याची जबाबदारी आहे. ‘स्?पुटनिक-व्ही’ची कमतरता या महिन्याच्या अखेरीस संपुष्टात येऊ शकते.