माद्रिद : ब्रिटनने आपल्या नागरिकांवर स्पेनचा प्रवास करण्यासाठी बंदी घातल्याने स्पेनच्या पर्यटन व्यवसायाला मोठा दणका बसला आहे. स्पेनमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अपुऱया सुविधा आहेत, हे कारण दाखवून ब्रिटनने निर्बंध घातले होते. स्पेनच्या अर्थव्यवस्थेत पर्यटनाचा वाटा 15 टक्क्मयांहून अधिक आहे. ब्रिटनच्या निर्बंधामुळे केवळ स्पेन नव्हे तर इतरही युरोपियन देशांच्या पर्यटनावर विपरित परिणाम झाला आहे. दोन महिन्यात स्थिती सुधारण्याची आशा आहे.
बेलारुस अध्यक्ष बाधित
बेलारुस : बेलारुस या छोटय़ा देशाचे अध्यक्ष अलेक्झांडर ल्युकाशेंको कोरोनाबाधित झाल्याचे वृत्त आहे. त्यांची सुरक्षा अधिकाऱयांबरोबर बैठक सुरू असतानाच त्यांना त्रास होऊ लागल्याने कामकाज बंद ठेवावे लागले. त्यानंतर त्यांची चाचणी घेण्यात आली असता त्यांना विषाणूची बाधा झाल्याचे समजले. नंतर त्यांनी पुन्हा बैठक सुरू करून आपल्याला कोरोना झाल्याचे स्पष्ट केले. या देशात 67 हजार कोरोना रुग्ण असूनही लॉकडाऊन झालेला नाही.