आयसीआयसीआय बँक-स्विगी हातमिळवणी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
फूड डिलिवरी प्लॅटफार्ममधील दिग्गज कंपनी म्हणून स्विगीला ओळखले जाते. परंतु कमीत कमी कालावधीत ग्राहकांकडून पेमेंट करण्याची सुविधा मिळावी यासाठी मंगळवारी स्विगीने आपली डिजिटल वॉलेट स्विगी मनीचे सादरीकरण केले आहे. सदर वॉलेटच्या मदतीने ग्राहक फक्त एका क्लिकवर आपले पेमेन्ट करण्याची सुविधा उपलब्ध होणार असल्याचे कंपनीने सांगतिले आहे. या डिजिटल सुविधाचा प्रारंभ स्विगीने आयसीआयसीआय बँकेची सोबत घेऊन केली असल्याचे स्पष्ट केले आहे.
ग्राहकांनी स्विगी मनीचा वापर केल्यास ग्राहकांना आपले फूड विकत घेतल्यास स्विगी मनीवर पडताळणी करुन तात्काळ पाहणे सोपे होणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे. कंपनीच्या माहितीनुसार ग्राहकांसाठी ही युती लाभदायक ठरणार आहे.
आपले परताव्याची रक्कम भविष्यामध्ये करावयाची ऑर्डर यासह अन्य सुविधांसाठी या डिजिटल वॉलेटचा वापर करता येणार आहे.
आयसीआयसीआय बँकेच्या ग्राहकांना ही सुविधा वापरण्याची सोय तात्काळ मिळणार आहे. यामध्ये अन्य बँकेच्या ग्राहकांना आपली माहिती देणे आवश्यक आहे. ही सेवा स्विगीकडून देशातील 500 पेक्षा अधिक शहरांमध्ये उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे स्पष्टीकरण स्विगीने दिले आहे.
व्यवहारात सुलभत आणण्याचा प्रयत्न
स्विगी मनीच्या मदतीने स्विगी फूडची ऑर्डर देण्यास सुलभता मिळणार असून सहजपणे पेमेंट करण्याचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचा पर्याय उपलब्ध करुन दिला असल्याचे स्विगीचे उपाध्यक्ष आनंद अग्रवाल यांनी म्हटले आहे.