ग्लॅसगो (स्कॉटलंड)
रविवारी येथे झालेल्या बिली जिन किंग चषक महिलांच्या सांघिक टेनिस स्पर्धेचे अजिंक्मयपद स्वीत्झर्लंडने पहिल्यांदाच पटकावले. या स्पर्धेतील अंतिम सामन्यात स्वीत्झर्लंडने ऑस्ट्रेलियाचा 2-0 असा एकतर्फी पराभव केला.
डब्लूटीए टूरवरील व्यावसायिक टेनिस क्षेत्रातील ही प्रति÷sची स्पर्धा म्हणून ओळखली जाते. रविवारी स्वीत्झर्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात जेतेपदाच्या लढतीला प्रारंभ झाला. या लढतीतील दोन्ही एकेरी सामने स्वीत्झर्लंडने जिंकल्याने त्यांचे जेतेपद निश्चित झाले. स्वीसच्या जिल टिचमन आणि विद्यमान ऑलिम्पिक चॅम्पियन बेलिंडा बेनसिक यांनी एकेरीचे सामने जिंकले. पहिल्या एकेरी सामन्यात टिचमनने ऑस्ट्रेलियाच्या स्टॉर्म सँडर्सचा 6-3, 4-6, 6-3 असा पराभव केला. त्यानंतर दुसऱया एकेरी सामन्यात स्वीसच्या जिल टिचमनने ऑस्ट्रेलियाच्या ऍजेला टॉमलिजोनोव्हिकवर 6-2, 6-1 अशी मात केली. एकेरीतील दोन्ही सामने जिंकल्याने स्वीसने बिली जिन किंग चषकावर आपले नाव पहिल्यांदाच कोरले. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत सातवेळा या स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविले आहे. 1974 साली ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा बिली जिन किंग चषक जिंकला होता. 2023 च्या बिली जिन किंग चषक टेनिस स्पर्धेच्या प्रवेशासाठी पात्र फेरीची स्पर्धा 14-15 एप्रिल रोजी आयोजित केली आहे.